मच्छीमारानी समुद्रात जाऊ नये हवामान खात्याकडून अलर्ट

मच्छीमारानी समुद्रात जाऊ नये हवामान खात्याकडून अलर्ट
संग्रहित चित्र

भारतीय हवामान खाते कुलाबा मुंबई कडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 8 जून 2022 ते 10 जून 2022 या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा व लगतच्या पूर्व व मध्य अरबी समुद्राच्या ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात असा इशारा वर्तवण्यात आला आहे तरी मच्छीमारानी संबंधित कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने याबाबत सर्वांना कळवले आहे