बिबट्या पडला विहिरीत मग काय झाले वाचा सविस्तर

बिबट्या पडला विहिरीत मग काय झाले वाचा सविस्तर
विहिरीत पडलेला बिबट्या दिसत आहे

 गुहागर तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील एका सार्वजनिक विहीरीत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याचा बछडा विहिरीत पडला.  मात्र वनविभागाने त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याद्वारे बछड्याची सुटका केली.

गुहागर तालुक्यातील तवसाळ बाबरवाडीतील सार्वजनिक विहीरीमध्ये रात्री हा बिबट्याचा बछडा पडला होता. विहीरीच्या ढासळलेल्या भागात हा बछडा बसल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती वनविभागापर्यंत पोहचवली. त्यानंतर गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, खेडचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, दत्ताराम सुर्वे पिंजरा घेवून घटनास्थळी पोहचले. त्यांनी येथील ग्रामस्थांच्या मदतीने बछड्याला विहीरीतून बाहेर काढले. या बछड्याचे वय सुमारे दिड वर्ष होते.