तारकर्ली येथे बोट बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू...स्कुबा डायड्व्हिंग करून माघारी परतत असताना अचानक बोट बुडाली

तारकर्ली येथे बोट बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू...स्कुबा डायड्व्हिंग करून माघारी परतत असताना अचानक बोट  बुडाली

सिंधुदुर्ग : स्कुबा ड्रायव्हिंग करून माघारी परतत असताना अचानक बोट उलटल्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात  तारकर्ली येथे दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर एक जण अत्यवस्थ आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तारकर्ली येथील पर्यटन केंद्रा समोरील समुद्रात घडली. बोटीवरील २० जण पाण्यात फेकले गेले.  यात तीन लहान  मुलांचा समावेश होता. या मुलांचा जीव वाचला आहे. अन्य अत्यवस्थ पर्यटकांना अधिक उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका महिला पर्यटकाही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग  तसेच अन्य भागातील काही महिला लहान मुलांसह पर्यटक तारकर्ली येथील समुद्रात स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी आले होते. स्कुबा डायविंग करून बोटीतून किनाऱ्यावर माघारी जाताना किनाऱ्यापासून शंभर मीटर अंतरावर बोट अचानक पलटी झाली. त्यामुळे बोटीवरील लोक पाण्यात फेकले गेले. यात महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे किनारपट्टी भागात खळबळ उडाली.
   बोटीवरील स्कूबा व्यावसायिकांनी बुडालेल्या सर्वांना किनाऱ्यावर आणले. यावेळी बेशुद्ध असणाऱ्या पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आकाश भास्करराव देशमुख (वय ३० रा. शास्त्रीनगर, अकोला) आणि स्वप्नील मारुती पिसे (वय ४१, रा. आळेघाट, पुणे) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. अन्य एक महिला पर्यटक गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत दीड ते तीन वर्षांपर्यंतची तीन  मुले पाण्यात फेकली गेली होती. या मुलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने मुलांचे प्राण वाचले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
रश्मी निशेल कासूल (४५, रा. ऐरोली, नवी मुंबई)  आणि संतोष यशवंतराव (३८, रा. बोरिवली-मुंबई) या दोघा पर्यटकांना मालवण मध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृणाल मनीष यशवंतराव (वय ८, रा. बोरिवली-मुंबई), ग्रंथ मनीष यशवंतराव (वय दीड वर्ष, रा बोरिवली मुंबई)  संतोष यशवंतराव (वय साडेचार वर्ष रा बोरीवली मुंबई),  वैभव रामचंद्र सावंत (वय ४० वर्ष रा वायरी तारकर्ली),  उदय भावे (वय ४०, रा. ऐरोली नवी मुंबई)  या सर्वांवर  मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तर शुभम गजानन कोरगावकर (वय २२ रा केरवडे कुडाळ), शुभांगी गजानन कोरगावकर (वय २६, रा. केरवडे कुडाळ), लैलेश प्रदीप परब (वय ३२, रा कुडाळ), अश्विनी लैलेश परब (वय ३०,  कुडाळ), मुग्धा मनीष यशवंतराव (वय ४० रा बोरिवली मुंबई),  मनीष यशवंतराव (वय ४०, बोरिवली मुंबई)  आयुक्ती यशवंतराव (वय  ३१ रा. बोरीवली मुंबई) सुशांत आण्‍णासो धुमाळे (वय ३२ रा जयसिंगपूर कोल्हापूर),  गीतांजली सुशांत धुमाळे (वय २८, जयसिंगपूर कोल्हापूर)  प्रियन संदीप राडे (वय १४ रा. आनंद नगर पुणे) सुप्रिया मारुती पिसे (वय ३१, रा. पुणे)  या सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली
    दरम्यान तारकर्ली पर्यटन केंद्र समोरील समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन झालेल्या अपघातात पर्यटक पाण्यात बुडाले या घटनेची माहिती मिळताच पर्यटन व्यवसायिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार प्रांत पोलिस अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला.