हत्तींना रोखण्यासाठी बसवण्यात आले आहे नवीन यंत्र

हत्तींना रोखण्यासाठी बसवण्यात आले आहे नवीन यंत्र
हत्ती येणार आहेत हे दर्शवणारे छायाचित्रात यंत्र दिसत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्ले येथे हत्ती मार्गावर पहिला प्रयोग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, तालुक्यात हत्ती बाधित क्षेत्रात विविध प्रयोग करून हत्ती नुकसानी टाळण्यासाठी व प्रतिबंधासाठी विविध उपयोग करण्यात येत आहेत. आता हत्ती आल्याची चाहूल लागावी तसेच त्यावर उपापाययोजना करता याव्यात हत्तींचा नेमका मार्ग कोणता हे ओळखण्यासाठी बांदा येथील कॉर्बेटी फाउंडेशन तर्फे  सायरन मशीन जे कॅरी गाझियाबाद कंपनीने तयार केले आहे ते मोर्ले येथील हत्ती येण्याच्या मार्गावर प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आल्याची माहिती दोडामार्ग तालुका शिवसेना संघटक व सामाजीक कार्यकर्ते गोपाळ गवस यांनी दिली.