एसटी ला चाकरमान्यांच उदंड प्रतिसाद मात्र आरटीओ पासिंग अभावी लांजा आगाराकडे एसटी बसची कमतरता
पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या एसटी बसकडे पुन्हा एकदा प्रवाशांचा ओढा वाढला असून मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची पहिली पसंती ही एसटीला असून दररोज लांजा आगारातून मुंबई, बोरीवली, परेल आणि कल्याण मार्गावर जाणाऱ्या चारही फेऱ्या प्रवाशांनी फुल्ल आहेत. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे २८ मे पर्यंत च्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले.
लग्नसराई, वाडी, गावच्या पूजा यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी हे गावी दाखल झाले आहेत.आ चाकरमान्यांना आता पुन्हा एकदा मुंबईची ओढ लागली असून या सर्व मुंबईला जाणार्या चाकरमान्यांची प्रथम पसंती ही एसटी बसला मिळत असल्याचे एकूण चित्र दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर एसटी फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. मात्र एसटी हीच लोकांची पहिली पसंती असल्याचे दिसून येत आहे. संपामुळे लांजा आगाराच्या अनेक एसटी बस गाड्यांचे आरटीओ पासिंग झालेले नाही. त्यामुळे लांजा आगाराला एसटी बस गाड्यांची कमतरता जाणवत आहे .
मुंबईकर चाकरमान्यांचा प्रचंड ओढा हा एसटी कडे वळला आहे. मात्र एसटी बस उपलब्ध असल्या तरी आरटीओकडून त्यांचे पासिंग झालेेले नसल्याने मागणीच्या तुलनेत लांजा आगाराकडे एसटी फेऱ्यांची कमतरता आहे. सद्यस्थितीत लांजा आगाराकडून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दररोज चार एसटी बस सोडण्यात येत असून या चारही फेऱ्यांचे २८ मे पर्यंत सर्व बुकिंग फूल झाले असल्याचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले.
लांजा आगारा मार्फत मुंबई चाकरमान्यांसाठी दररोज मुंबई, बोरीवली, कल्याण आणि परेल या मार्गांवर जादा फेऱ्यां सोडण्यात येत आहेत. या बरोबरच प्रवाशांच्या मागणीनुसार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आरक्षण खिडकीवर आरक्षण उपलब्ध करून दिलेले असून प्रवाशांनी या खिडकीवर तिकीट बुक करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे.
लांजा शहरातून सद्यस्थितीत दहा ते पंधरा खाजगी लक्झरी बस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे धावत आहेत. असे असले तरी प्रवाशांची पहिली पसंती ही एसटी बसला असल्याचे दिसत आहे. एसटी आगाराकडे बस असल्या तरी अनेक एसटी बसचे आरटीओ पासिंग झालेले नसल्याने गतवर्षीच्या तुलनेत मुंबईकर चाकरमान्यांना जादा फेऱ्या सोडण्या साठी लांजा आगाराकडे बस तितक्या उपलब्ध नाहीत मात्र तरीही असणार दररोज सोडण्यात येणा-या
चारही फेऱ्यांचे आरक्षण २८ मे पर्यंत फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे असणारा ओढा आजही कायम असल्याचे चित्र त्यामुळे दिसून येत आहे.
Bni salah transfer