राजापुरात रायपाटण पाचल ला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

राजापुरात रायपाटण पाचल ला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा
रायपटणमध्ये बुधवारी सायंकाळी जोरदार चक्रीवादळाचा दणका बसला त्यामध्ये झालेले घराचे नुकसान

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

https://play.google.com/store/apps/details?id=com.kokanlive.Digital_News

राजापूर तालुक्याच्या पाचल पूर्व परिसराला बुधवारी सायंकाळी जोरदार वादळाने धडक दिली आहे या वादळाने मोठी पडझड झाली असून आंबा ,काजू ,सुपारी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून काही घरे आणि गोट्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे 

 या चक्रीवादळाने काही ठिकाणी अजूनही उभ्या असलेल्या होळ्या कलंडल्याची चर्चा गावागावांमध्ये सुरू आहे सुदैवाने जीवित हानी टळली आहे 
बुधवारी सायंकाळी उशिरा रायपटन ,पाचल मध्ये या वादळाने मोठी पडझड झाली आहे अनेकांच्या घरावर झाडे उन्मळून पडली आहेत बुधवारी रात्रीपासून याठिकाणी वीज देखील नसल्याने लोक हैराण झाले आहेत 
बुधवारी सायंकाळी राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरात जोरदार चक्रीवादळाचा तडाखा बसला सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते सायंकाळी वाऱ्याने वेग धारण केला आणि जोरदार चक्रिवादळ सदृश्य वारे वाहू लागले त्यामुळे जणू काही चक्रीवादळ झाले असे गावकऱ्यांनी सांगितलं

https://play.google.com/store/apps/details?id=com.kokanlive.Digital_News