कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज च्या आजच्या हेडलाईन्स
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज l हेडलाईन्स⤵️
30 जानेवारी
➡️ पहिली ते नववीच्या शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून सुरू होणार; १५ ते १८ वयोगटाच्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनातून लस
➡️ राज्यात गत आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढला असून उपराजधानीसह संपूर्ण विदर्भ गारठला; गोंदियात सर्वाधिक नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तर उपराजधानीत ७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
➡️ महाराष्ट्र बांबू मंडळाला हरित लवादाची नोटीस महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने केलेल्या वनसंवर्धन कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा आणि कारखाने अधिनियमांच्या उल्लंघनाची दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतली
➡️ शाहू, फुले आंबेडकर निवासी शाळा योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या १६५ पात्र निवासी आश्रमाशाळा दोन वर्षांपासून अनुदानापासून वंचित
➡️ कोरोना संपेपर्यंत राज्यात मुखपट्टी बंधनकारक; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती; मुखपट्टी वापराचे बंधन उठवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चाही झालेली नाही
➡️ औरंगाबाद : बनावट सातबारा वापरुन ग्रामीण बँकेची ५० लाखांची फसवणूक; एकाच कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल
➡️ निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज; राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून घोषणा
➡️ कात्रज प्राणिसंग्रहालयात दोन जिराफ आणि दोन झेब्रा हे आफ्रिकेतील प्राणी आयात करण्याच्या पुणे महापालिकेच्या प्रस्तावाला शहरातील प्राणिप्रेमींचा विरोध
➡️ कल्याण : पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य; अनेकांच्या भुवया उंचावल्या
➡️ सलग दोन वर्षे टाळेबंदीचा फटाका सहन केलेल्या चित्रपटगृह व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा करातून मुक्तता देण्यासाठी केंद्र सरकारकडे केली मागणी
➡️ लवकरच भारतात नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार; भारत बायोटकेच्या इन्ट्राननेझल बुस्टर डोसला केंद्र सरकारने दिली मंजुरी
➡️ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी प्रचारासाठी यूपीत जाणार; 31 जानेवारीला पहिल्या वर्च्युअल रॅलीने जनतेला करणार संबोधित
➡️ राज्यात तिसरी लाट येऊन गेली, तरी स्वतःला वाचवण्यासाठी मास्क महत्वाचाच! नव्या व्हेरिएंटचा WHO कडून अभ्यास सुरू - आरोग्य मंत्री टोपे
➡️ शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला ठाण्यातून केली अटक
➡️ पुण्यात येत्या 1 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरु होणार; पहिली ते आठवीचे वर्ग दुपारपर्यंतच सुरु राहणार, अजित पवार यांनी दिली माहिती
➡️ नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश; ते म्हणाले, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील मी दिलगिरी व्यक्त करतो
➡️ आता युट्यूब शॉर्ट्समध्ये व्हॉईस ओव्हर फीचर देखील कंपनी देणार; यूट्यूबने नवीन फीचरबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही
➡️ इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी Hop Electric नं केली मोठी घोषणा; कंपनी एक हाय-स्पीड इलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार
➡️ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीने रचला इतिहास; तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले
➡️ पुणे जिल्हा 30 जानेवारीला हंगामातील दुसरा सर्वात थंड दिवस म्हणून नोंदवला. 25 जानेवारीपासून पुणे शहराचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे आणि 30 जानेवारी रोजी 8.6 अंश सेल्सिअससह हंगामातील दुसरा सर्वात थंड दिवस नोंदवला गेला आहे.
➡️ करोना रुग्णसंख्या घटली, पण ओमिक्रॉनने मुंबई, पुण्यात धास्ती वाढवली. राज्यातील करोनाची लाट हळूहळू ओसरत असल्याचे चित्र असतानाच, ओमिक्रॉन व्हेरियंटने धास्ती वाढवली आहे. काल, शनिवारी राज्यात ओमिक्रॉनचे ८५ रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि मुंबईत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
➡️ कर्नाटकात नाईट कर्फ्यू मागे; महाराष्ट्रातून येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह अहवालाची सक्ती कायम. कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी पासून नाईट कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. तसेच बंगळूरमधील सर्व शाळांना सोमवारपासून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
➡️ एक्झिट पोल: एका अधिसूचनेत, भारत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीने कोणताही एक्झिट पोल आयोजित करू नये आणि कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल छापून किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये.असे निवडणूक आयोगाची विनंती
➡️ काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. अनंतनागच्या बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घातल्या, हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद असे पोलिसाचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
Bni salah transfer