येत्या 27 जानेवारीला लांजा शहर राहणार पूर्ण बंद मुंबई महामार्ग रोखला जाणार ग्रामस्थांचा इशारा

येत्या 27 जानेवारीला लांजा शहर राहणार पूर्ण बंद मुंबई महामार्ग रोखला जाणार ग्रामस्थांचा इशारा
लांजा नागरी पतसंस्थेच्या हॉलमध्ये पार पडली लांजा वासीयांची पत्रकार परिषद

मुंबई-गोवा महामार्ग बाबत लांजातील ग्रामस्थांचा एल्गार येत्या 27 जानेवारीला मुंबई-गोवा महामार्ग करणार जाम तसेच शंभर टक्के लांजा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय आज लांजा व्यापारी संघटना तर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आला आहे

यावेळी महंमद रखांगी यांनी सांगितलं की

पत्रकार परिषद????????

सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी निश्चितपणे एक दिशा ठरवून  गुरुवार 27 जानेवारीला लांजातील गावातील जो रस्ता आहे या रस्त्याचा अशा पद्धतीची सुधारणा व्हावी की तीस ते चाळीस वर्ष टिकेल असा रस्ता व्हावा
तसेच पावसाळ्यामध्ये ही रस्ता असा असावा की या वाहनांची ये-जा व्यवस्थितपणे व्हावी त्याच्यापासून परत रस्त्याला बाधा येऊ नये रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे ही जर चांगले नसतील तर रस्ता टिकणार नाही म्हणून जास्त योग्यरीत्या जोपर्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं होत नाही तोपर्यंत हे रस्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू राहील येत्या 27 जानेवारी चे होणारे आंदोलन वेगळ्या पद्धतीने तसेच पुढे नेण्याचा मनोदय आज या ठिकाणी एक निश्चित करण्यात आलेले आहे या पाठीमागे अतिशय संयमाने गाव चे सगळे मानकरी यांनी सांगितले की त्याच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे लांजा वासीय या आंदोलनात सामील होणार आहेत

 या आंदोलनात निश्चितपणे इतर लोकांना त्रास होणार नाही वाहनचालकांना वेगळ्या पद्धतीचा त्रास होणार नाही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेने पण गेले अनेक दिवस भिजत असलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांच्या बुद्धीला चालना देऊन हा मार्ग चांगला करण्यासाठी आणि त्यातून कुठला तरी तोडगा निघण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सतत विकृतीने प्रयत्न केला पाहिजे अशी इथल्या सगळ्या मानकरयांची आणि व्यापारी संघटने ची भावना आहे

 आज विशेषता वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटनेने तसेच रोहिदास समाज मराठा समाज मुस्लिम समाज व लांजा तालुक्यातील सर्व समाजातील लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे तसेच लांजातील रिक्षा संघटना पत्रकार संघटना ट्रॅव्हल संघटना यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे म्हणून या आंदोलनाचं
 वेगळे चित्र बघायला मिळेल आणि आम्हाला ठाम विश्वास आहे आमच्या ग्रामदेवते वर आमचा सगळ्या समस्या यावर त्यांचा विश्वास आहे तर मंडळी एक होतात त्यांचा विजय निश्चित असतो आणि म्हणून त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा पक्षीय लवलेश नसलेले हे आंदोलन आहे आम्हाला कोणालाही दोष द्यायचा नाही कुठल्याच राजकीय संघटना कुठलाच राजकीय पक्षाला दोष द्यायचा नाही परंतु ज्यांना ज्यांना आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी निश्चित पुढे येऊन पाठिंबा द्यावा   व हे आंदोलन यशस्वी पार पाडण्यास एकरुप व्हावे