रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीची पार पडली बैठक

रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीची पार पडली बैठक

रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीची बैठक आज तेली समाज कार्यालय , तेली आळी रत्नागिरी येथे अध्यक्ष नंदकुमार मोहीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .


        ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे , ओबीसींचे आरक्षण कायम राहिले पाहिजे यासाठी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले . तालुक्याचे चार विभाग करुन गावागावात जाण्यासाठी विभागवार कमिटी तयार करण्यात आल्या . ओबीसींच्या मागण्यांचे बॅनर गावोगावी तयार करुन लावण्याचे ठरविण्यात आले . ओबीसींवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवण्यात आली .  गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्व ओबीसी बांधवांना ॲड महेंद्र मांडवकर यांनी जामीन मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले . 
        येत्या सर्व निवडणुकीत जिल्ह्यात आणि तालुक्यात ८५% असलेल्या ओबीसींमधुनच लोकप्रतिनीधी निवडुन आणण्याचा निर्धार अध्यक्ष नंदकुमार मोहीते यांनी व्यक्त केला . रत्नागिरी शहरामध्ये दिनांक २६ , २७ ,२८ जानेवारी ला प्रभागवार बैठका आयोजीत करण्यात येणार आहेत त्यासाठी रघुवीर शेलार ,मुन्ना चवंडे , राजीव कीर , शरयु गोताड , दादा ढेकणे , सुरेंद्र घुडे , रुपेंद्र शिवलकर , सलील डाफळे , बाबा नागवेकर , नितीन तळेकर , बंटी कीर ,निलचंद्र साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली . त्यानंतर ५० सभा ग्रामिण भागामध्ये ओबीसींचा झंझावात निर्माण केला जाणार आहे .
          *यावेळी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचीव धनंजन शिंदे यांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला पाठिंब्याचे पत्र आप चे अंतरीम संयोजक ज्योतीप्रभा पाटील यांच्या मार्फत अध्यक्ष नंदकुमार मोहीते यांच्याकडे देण्यात आले* 
        *यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बावाशेठ साळवी ,महिला तालुका अध्यक्षा सौ साक्षी रावणांक , तालुका उपाध्यक्ष राजीव कीर , दिपक राउत , शहर अध्यक्ष मुन्ना चवंडे , महिला शहर अध्यक्ष सौ शरयु गोताड . तेली समाज जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार , भंडारी समाज अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर , कटबू समाज अध्यक्ष बी टी मोरे , वर्षा ढेकणे , अरुणा पेटकर ,  सचीव सुधीर वासावे , सहसचीव प्रदिप घडशी , शांताराम मालप , सलील डाफळे , पर्शुराम ढेकणे , निलचंद्र साळुंखे , सुरेंद्र घुडे , अनंत भडकमकर , कौस्तुभ नागवेकर , परीस पाटील , मयुर बळगे , जान्हवी खरडे, मंदार शिंदे , सचिन भातडे , नारायण आग्रे , गौरव नाखरेकर , सागर कळंबटे यांच्यासहीत अनेक ओबीसी बंधु भगिनी उपस्थित होते .