कोकण प्रेस क्लब तर्फे पोंभुर्ले या ठिकाणी पत्रकार दिन साजरा

कोकण प्रेस क्लब तर्फे पोंभुर्ले या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या निवासस्थानी असलेली पालखी यावेळी निवासस्थानातून दर्पण सभागृहा पर्यंत नेहन्यात आली यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ लोकमत समूहाचे संपादक वसंत भोसले ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांबेकर वैद्यकीय सेवा पुरवणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश चीवते कोकण प्रेस क्लबचे अध्यक्ष रुबीन  मुजावर उपाध्यक्ष राहुल वर्दे इंडिया न्यूज चे प्रतिनिधि मुस्कान मुजावर  उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमात covid काळात डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्यासाठी एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं तसेच येथे आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  

करोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षी करोना चे सर्व नियम पाळून या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला