लांजा येथील अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याने पोक्सा अंतर्गत युवकाला वीस वर्षाचा कारावास
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
14 वर्षीय मुलीशी ओळख करुन तिचा गैरफायदा घेत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून तिला गर्भवती करणार्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी 20 वर्ष सक्तमजूरी आणि 24 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे
अक्षय शिवाजी गवड (23,मुळ रा.बादेवाडी पन्हाळा,कोल्हापूर सध्या रा.लांजा,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याने लांजा येथील अल्पवयीन मुलीशी ओळख करुन तिच्याशी मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत शारिरीक संबंध ठेवले.काही दिवसांनी पिडीतेला त्रास जाणवू लागल्याने तिच्या आईने तिला लांजा येथील खासगी डॉक्टरकडे नेले होते.परंतू तिचा त्रास वाढल्याने तिच्या आईने तिला अधिक उपचरांसाठी कोल्हापूरला नेउन त्याठिकाणी तिची सोनोग्राफी करण्यात आली.त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला.
पीडतेच्या आईने याबाबत आरोपी अक्षय गवड विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.परंतू हा गुन्हा लांजा येथे घडल्याने हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.याप्रकरणी लांजा पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.हा खटला न्यायालयात सुरु होता.शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधिश वैजयंतीमाला राउत यांनी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी 18 साक्षिदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला भादंवि कलम 376 तसेच पोक्सो कायदा कलम 4,6,8,10 अन्वये दोषी ठरवून 20 वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्याचा लांजा पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल गंभिर आणि पोलिस निरीक्षक श्वेता पाटील यांंनी तपास केला.तसेच पैरवी अधिकारी म्हणून कदम यांनी काम पाहिले.
Bni salah transfer