आंबा घाट रस्ता दुरुस्ती सुरू -शेतकरी -कष्टकरी संघटनेचा दणका -अशोकराव जाधव

आंबा घाट रस्ता दुरुस्ती सुरू -शेतकरी -कष्टकरी संघटनेचा दणका -अशोकराव जाधव
Amba ghat

आंबा घाट रस्ता दुरुस्ती सुरू , शेतकरी -कष्टकरी संघटनेचा दणका -अशोकराव जाधव

देवरूख -रत्नागिरी नागपूर हायवे साखरपा , मुर्शी ,दःखण आंबा घाटातील रस्तात पडलेले जिवघेणे अपघातास कारणीभुत ठरत असलेले खड्डे बुधवार १२ जानेवारी 2022 पर्यंत न भरल्यास रस्ता रोको अंदोलन शेतकरी _ कष्टकरी संघटना व काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते त्याची दखल तातडीने नॅशनल हायवे ऑथरटी नवी दिल्ली यांनी घेतली व कार्यकारी अभियंता बांगर साहेब यांनी शेतकरी _ कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना १2 जानेवारी पर्यंत काम पूर्ण करू एखादे वेळेस चार पाच दिवस पुढे मागे होतील पण रस्ताचे खड्डे पूर्ण खडी डांबराने भरू व वाहतूक व्यवस्था सुरळीत करू असे सांगितले सदर काम ऊपअभियंता मडकईकर यांचे देखरेखी खाली चालू आहे काम चालू असलेचे फोटो

ही संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना आणि काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा ऊपाध्यक्ष , प्रवक्ते अशोकराव जाधव यांना पाठवून दिले आणि १२ तारखेचे रस्ता रोको आंदोलन करू नये अशी विनंती केली . त्या प्रमाणे अशोकराव जाधव , विश्वनाथ किल्लेदार , कॅप्टन हनिफ खलपे , जेष्ठ नेते प्रा आबाजी सावंत , जिल्हा ऊपाध्यक्ष राजेश पत्यानी ,युवक नेते बापू लोटणकर , सुरेश शिंदे , अशोक (दादा ) गांधी , काका शेटये, माने सर , भाई बेर्ड , पत्की , मुरलीधर बाईंग, जायगडे , कोलते , दळवी, चाळके इत्यादी काँग्रेस नेते व शेतकरी _ कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी हे संयुक्त पणे पहाणी करुन दिनांक १o जानेवारी रोजी अंदोलन करायचे की स्थगित करायचे ?याचा निर्णय घेतला जाईल असे विश्वनाथ किल्लेदार सरचिटणीस शेतकरी -कष्टकरी संघटना यांनी सांगितले . आम्ही रस्ता दुरुस्त करतो पण रस्ता रोको आंदोलन करू नका असा प्रस्ताव प्रशासनाने अशोकराव जाधव यांचे समोर ठेवला आहे . अशोकराव जाधव यांनी चिपळूण मधील कुंभलिी घाट दुरुस्ती करता 2०डिसेंबर 2o21 ला अंदोलन छेडले होते ते अंदोलन रस्ता दुरुस्त करून घेवून यशस्वी केलेच आता आंबा घाटाचे अंदोलन पुकारले नंतर घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले आहे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनीधी कसा असावा याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे अशोकराव जाधवां सारखाच असावा ,अशी चर्चा रत्नागिरी , सिंधुदूर्ग मध्ये सुरू आहे असे किल्लेदार यांनी सांगितले .