विरोधी दोन उमेदवार या रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाले आहेत
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध झाले होते. तर सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकारच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली. तर दोघांना पराभव पत्करावा लागला.
विरोधी दोन उमेदवार या रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाले आहेत. विद्यमान तीन संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव,
लांजा तालुका भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहेत.
जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे यांना 692 मते, सचिन चंद्रकांत बाईत यांना 164 मते मिळाली. कांबळे 528 मतांनी निवडून आले. जिल्हास्तरीय मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते यांना 48 मते, राकेश श्रीपत जाधव यांना 45 मते मिळाली. विद्यमान संचालक मोहिते केवळ तीन मतांनी निवडून आले आहेत.
जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज यांना 66 मते, ॲड. सुजित भागोजी झिमण यांना 56 मते मिळाली. विद्यमान संचालक रेडिज 10 मतांनी निवडून आले आहेत.
Bni salah transfer