महामार्गावर तोडगा काढा अन्यथा २७ जानेवारीचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा नागरिक व व्यापारयानी दिला
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीबाबत व्यापारी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लांज्यातील व्यापारी, नागरिक आणि महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची लांजा तहसीलदार यांनी आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. मंगळवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेल्या या बैठकीला महामार्ग विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा ठेकेदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने चर्चा निष्फळ झाली दरम्यान महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांच्या या अवसानघातकी भूमिकेबद्दल उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान यापुढे लांजा तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि आम्हाला योग्य तो तोडगा, उपाय सांगावा अन्यथा २७ जानेवारी रोजी केले जाणारे आंदोलन हे यापेक्षा अधिक तीव्रपणे केले जाईल असा इशारा लांजा तालुका व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या वतीने देण्यात आले
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्य खड्ड्यांमुळे आणि उडणार्या धुळीमुळे बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे .तसेच पादचारी, वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे .त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा पुढील आठ दिवसात आंदोलन, चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे एक तास उलटूनही या बैठकीला महामार्ग विभागाचे अधिकारी मडकईकर वगळता अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच कंपनीचे पदाधिकारी कोणीही उपस्थित राहीले नाहीत. याबाबत उपस्थित लांजा नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अशाप्रकारे आम्हाला वेठीस धरणे चुकीचे असून आता यापुढे आम्ही कोणत्या प्रकारची चर्चा करणार नाही. यामुळे लांजा तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा अन्यथा २७ जानेवारीचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा नागरिक व्यापारी देण्यात आला आहे.
Bni salah transfer