पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना खारेपाटण चेकपोस्ट येथे अपघात
*पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना खारेपाटण चेकपोस्ट येथे अपघात*
*वाहनांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान*
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफयातील मधील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक ही घटना दुपारी ११.३० च्या दरम्यान घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे या गाड्या असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकून अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसून या मधे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Bni salah transfer