नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड थांबा 26 जानेवारी च्या बेमुदत उपोषण ला सर्व स्तरावरून वाढत पाठींबा

नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड थांबा  26 जानेवारी च्या बेमुदत उपोषण ला सर्व स्तरावरून वाढत पाठींबा
नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसना  संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने आयोजित केलेल्या बेमुदत उपोषणाला सर्व स्तरातून प्रतिसाद वाढत आहे. निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण या फेसबुक समूहातर्फे समूहप्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि सहकारी स्वातंत्र्यदिनी 26 जानेवारी 2022 रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून बेमुदत उपोषण करणार आहेत.
या सनदशीर आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना,  ग्रामविकास मंडळे व तालुक्यातील *नागरिकांकडून* मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. 

कोकण रेल्वे प्रत्येक वेळी विविध रेल्वे आरक्षणाचे कोटे दाखवून संगमेश्वर स्थानकासाठी तिकीट आरक्षण संख्या कमी असल्याचा दावा करत आहे. या स्थानकात एकूण अप-डाऊन अशा दहा गाड्या थांबतात. पण काही गाड्या अवेळी येत असल्याने प्रवाशांना आपल्या गावात जाण्या-येण्यास त्रास होतो  आणि गैरसोयीचे ठरते. मन:स्ताप आणि आर्थिक भुर्दंडामुळे शेकडो प्रवासी त्रस्त आहेत. नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन गाड्या दिवसाउजेडी येत असल्याने त्या प्रवाशांना सोयीच्या ठरतील. त्यामुळे तमाम संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने हे बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समूह प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
उपोषणाच्या ठिकाणी कोविड संदर्भात सर्व नियम पाळले जातील, पण त्या दिवशी उपोषणास काही गाल बोट लागले  व करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला कोकण रेल्वेच जबाबदार असेल, असा इशारा संदेश जिमन यांनी दिला आहे व तशी कल्पना  या आधीच कोकण रेल्वे प्रशासन आणि *सर्व संबंधित* प्रशासकीय यंत्रणांना  26 जानेवारी च्या उपोषण च्या पत्रात लेखी स्वरूपात कळवली असल्याचे त्यांनी सांगितले.