लांजा तालुक्यात शेतकऱ्यावर गवा रेड्याचा हल्ला ...शेतकऱ्याचे पोट फाडून कोथळा काढला बाहेर

लांजा तालुक्यात शेतकऱ्यावर गवा रेड्याचा हल्ला ...शेतकऱ्याचे पोट फाडून कोथळा काढला बाहेर

Kokan Live Digital News:

लांजा तालुक्यातील माचाळ येथे एका शेतकऱ्यावर आज दुपारी तीन च्या सुमारास गव्या  रेड्याचा हल्ला झाल्याने शेतकरी गंभीरित्या जखमी झाला आहे दरम्यान हा हल्ला झाल्यावर शेतकऱ्याच्या पोटातील आतडे बाहेर आले आहे त्यामुळे आता लांजा तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

 संपूर्ण घटना अशी की भिकाजी राघव मांडवकर वय 65 हे आपल्या शेतात दुपारच्या वेळी कामात मग्न होते त्यावेळी अचानक त्या ठिकाणी गवारेडा त्यांच्यासमोर आला व त्याने सरळ त्यांच्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर या शेतकऱ्याचे पोटातील आतडे बाहेर आले आजूबाजूला असलेले काही शेतकरी देखील हा प्रकार पाहत होते मात्र काही वेळानंतर गवारेडा जंगलात पसार झाल्याचे समजते ही घटना कळताच लांजा वन विभाग तसेच स्थानिक लोकांनी ॲम्बुलन्स ची व्यवस्था केली आणि त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले सध्या त्यांच्यावर रत्नागिरी सिविल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेच्या वेळी वन विभागाचे संजय रणधीर व विक्रम कुंभार तात्काळ त्या ठिकाणी पोचून या शेतकऱ्याला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली व पंचनामा करून घेतला आहे