लांजा मोहरम दिनानिमित्त ताजियाची मिरवणूक भक्तिमय वातावरणात
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मोहरम च्या निमित्त लांजा मध्ये ताजिया मिरवणूक संपन्न झाली गेल्या कित्येक वर्षापासून लांजा शहरात मोहरमच्या दिवशी ताजियाची मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम व सर्व धर्मीयांचे एकात्मतेचे दर्शन पाहायला मिळते
लांजा सय्यद चंदशाह बुखारी बाबा दरगाह ते मुंबई गोवा हायवेवरून पोलतेश्वर मंदिर जवळ असलेल्या तलावापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येते.
दुपारी तीन वाजल्यापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली होती तर सायंकाळी सात वाजेपर्यंत ही मिरवणूक काढून मोहरम साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गर्दी देखील पाहायला मिळाली
या दरमियान लांजा शहरात दोन दिवस मुसळधार पडत असलेल्या पावसाने दुपारपासून विश्रांती घेतल्याचं चित्र होतं त्यामुळे ही मिरवणूक मोठ्या भक्तीमय वातावरणात वाजत गाजत निघाली या वेळी या ठिकाणी नाइक,मुजावर ,शेट्ये, कुलकर्णी, कुरूप मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते
Bni salah transfer