सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे.
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे.
सिंगापूर येथून तेल घेऊन आलेले बार्ज रविवारी दिनांक १७ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील १३ नॉटीकल मैल खोल समुद्रात आले असता सकाळी ९.३० वाजण्याच्या पलटी झाले. त्यामुळे बार्ज मधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. या बार्जवरील कर्माचारी सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू बाबत समजून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंगापूर येथील कंपनीचे 22 जूनला कोलंबो येथून निघालेल्या बार्जचा कलंडल्याने त्याच्या मुख्य टगशी समुद्रातील संपर्क तुटला होता. तर 9 जुलै पासून रडारवरील त्याची पॉझिशन सुद्धा दिसतं नव्हती. त्याचा शोध सुरु असतानाच त्याचे लोकेशन रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खोल समुद्रात किनाऱ्यापासून 13 नॉटिकल माईल्स वर आढळून आल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले आहे.
Breaking : सिंगापूर कंपनीचा भरकटलेला बार्ज रत्नागिरी किनारपट्टीला लागण्याची शक्यता?
Bni salah transfer