नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक लांजा तहसील कार्यालयात आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती घेण्यासाठी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत लांजा तहसीलदार कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी सतर्क रहावे, आपदग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी यांच्या मालमत्तेचे तसेच शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अशा सूचना शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी यावेळी दिल्या.
त्याप्रसंगी तहसीलदार प्रमोद कदम, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, नायब तहसीलदार रघुनाथ कांबळे, उज्वला केळुसकर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे,
महावितरण चे सावंत, वन विभागाचे आरेकर, जि प बांधकाम विभागाचे अभियंता बोमकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कुलकर्णी, नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर, लांजा आगार व्यवस्थापक पाटील, ग्रामीण रुग्णालयचे डॉ पाटील, तालुकाप्रमुख संदीप दळवी, माजी शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, माजी सभापती दीपाली दळवी, लीलाताई घडशी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उप नगराध्यक्ष स्वरूप गुरव, गटनेत्या पूर्वा मुळ्ये, नगरसेवक राजेश हळदणकर, युवासेना तालुका युवाधिकारी प्रसाद माने आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Bni salah transfer