रेल्वेचे स्वतःचे गेटवे पे ॲप ..आता बुकिंग होणार फटाफट आणि रिफंड ही होणार फटाफट

रेल्वेचे स्वतःचे गेटवे पे ॲप ..आता बुकिंग होणार फटाफट आणि रिफंड ही होणार फटाफट
संग्रहित चित्र

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

आयआरसीटीसीने म्हणजेच रेल्वेने आपला स्वत:चा पेमेंट गेटवे आणला आहे. IRCTC-iPay या नावाने रेल्वेने आपला गेटवे आणला आहे. यापूर्वी IRCTC iPay Means हा दुसऱ्या कंपनीकडून दिला गेलेला गेटवे होता. यामुळे पैशांचे व्यवहार होण्यास विलंब लागत होता. आता IRCTC-iPay मुळे अन्य बँकांच्या पेमेंट गेटवेवरून झटपट पेमेंट वळते होणार आहे. यामुळे तिकिटी बुकिंगला लागणारा वेळही वाचणार आहे. याचबरोबर तिकीट रद्द केल्यास त्याचे पेमेंटही प्रवाशाच्या खात्यात काही क्षणांत येणार आहे. अनेकदा वेटिंग तिकीट असेल तर ट्रेनचा फायनल चार्ट जोवर बनत नाही तोवर तिकिट कन्फर्म झालेय की नाही हे समजत नाही. जर कन्फर्म झाले नाही तर ते तिकीट रद्द केले जाते. अशावेळी रिफंड येण्यास वेळ लागत होता. काहीवेळा काही दिवस, आठवडे लागत होते. ते पैसे आले की नाहीत हे देखील अनेकांना कळत नव्हते. आता तसे होणार नाही, तिकीट रद्द झाले की त्याचा रिफंड तातडीने दिला जाणार आहे.