रत्नागिरीतील तीन दिवसीय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडले

रत्नागिरीतील तीन दिवसीय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडले
प्रमुखांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडत असताना चे चित्र

रुबिन मुजावर

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

रत्नागिरी येथे आयोजित तीन दिवसीय फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, कुमार शेटे, साहिल पठाण, अमेय पोतदार, जहीर शेख, आकाश साळुंखे आदींच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला..
 तिसऱ्या दिवशी रंगलेल्या अंतिम सामन्याची सुरुवात बशिर मुर्तुझा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्टोस उडवून करण्यात आली.. शेवटचा सामना गवळीवाडा यु एस सी आणि महापुरुष एफसी मध्ये चांगलाच रंगतदार ठरला..
 इसाक पठाण लेगसी कंपनी पुरस्कृत गवळीवाडा बाजारपेठ युथ स्पोर्ट्स क्लब आणि लांजा फुटबॉल क्लब आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते..
 तीन दिवसीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ॲड. सोहेल शेख, नौसिन काझी, जुबेर काझी, सुरज शेट्ये, नित्या वाघधरे , अरफात खतीब, शहजाद इब्जी, ईझार झारी, असद झारी, जाहीद कुरैशी, इम्तियाज कप्तान, नुजैद होदेकर, तांझिल काझी, अदनान ईब्जी, आफिफ झारी, सकलेन कुरैशी, आसिफ काझी, दादा कदम, प्रथमेश बामणे, आदी मान्यवर उपस्थित होते..