मुख्यमंत्र्यांनी राजापूरच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह -अजित यशवंतराव

मुख्यमंत्र्यांनी राजापूरच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह -अजित यशवंतराव
अजित यशवंतराव (राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस)

राजापूर कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात राबविण्याबाबत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नियर्ण नक्कीच स्वाागतार्ह आहे.
मात्र या प्रकल्पाच्या माध्यमातुन होणारी रोजगार निर्मिती, व्यवसाय आणि विकास यात स्थानिक भुमिपुत्र हा केंद्रबिंदू असला पाहिजे, या प्रकल्पाच्या माध्यमातुन स्थानिक बेरोजागर तरूण, महिला बचत गट, छोटे व्यावसायिक यांना प्राधान्याने संधी मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व युवा नेते अजित यशवंतराव यांनी दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.kokanlive.Digital_News

राजापूर तालुक्यात बारसू परिसरात १३ हजार एकर जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, हा प्रकल्प राजापूर तालुक्यात राबवावा असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भुमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यामुळे आता लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. शून्य विस्थापन आणि आवश्यक ती जागा या ठिकाणी असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही भुमिका घेतली असावी असेही त्यांनी नमुद केले.

त्यामुळे रिफायनरी सारख्या या मोठया प्रकल्पामुळे जर का कोकणातील बेरोजगार तरूणांना चांगला रोजगार मिळणार असेल, इथल्या महिला बचत गटांना काम मिळणार असेल, छोटया व्यावसायिकांना याचा लाभ होणार असेल तर या प्रकल्पाचे स्वागत केले पाहिजे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने संबधीत कंपनीशी करार करताना स्थानिकांना प्रथम प्राधान्य ही अट ठेवली पाहिजे अशी मागणीही यशवंतराव यांनी केली आहे.


या प्रकल्पाच्या माध्यमातुन निश्चितच आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पात असणाऱ्या नोकऱ्यांच्या दृष्टीकोनातुन तसे प्रशिक्षण इथल्या तरूण तरूणींना दिले पाहिजे, यासाठी आत्तापासूनच नियोजन केले पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्षात कंपनी ज्यावेळी कार्यान्वयीत होईल त्यावेळी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेले एक टिम कंपनीला मिळू शकेल. या प्रकल्पामुळे येणाऱ्या पुरक व्यवसायांमध्येही स्थानिकांना प्राधान्य असले पाहिजे, तर स्थानिक पातळीवर वेगवेगळया पध्दतीने कंपनीकडून त्यांच्या सीआरएफ निधीतुन विकास केला गेला पाहिजे असेही यशवंतराव यांनी नमुद केले आहे.