खेड शहरात घुमणार ढोल-ताशांचा गजर

खेड शहरात घुमणार ढोल-ताशांचा गजर

खेड कोकण लाइव्ह न्यूज़..

मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेड नगरीचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून खेड मनसे व राज वैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 21 मार्च रोजी ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे ढोल ताशांचा आवाज घुमणार आहे

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धे मधील विजेत्यास 7000 रुपये तर उप विजेत्यास तीन हजार रुपये तृतीय क्रमांकास पंचवीस शे रुपये उत्तेजनार्थ क्रमांकास पंधराशे रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी विनय माळी यांच्याकडे नाव नोंदवायचे आहे असे आवाहन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेड येथे केले आहे याच वेळी पोवाडे गायनाचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे