आता चौकार तूच ठोकायचा आहेस.. खा.राऊतांनी दिले उमेदवारीचे संकेत

आता चौकार तूच ठोकायचा आहेस..  खा.राऊतांनी दिले उमेदवारीचे संकेत

"राजन" हैट्रिक झाली...आता चौकार तूच ठोकायचा आहेस..

खा.राऊतांनी दिले उमेदवारीचे संकेत

 वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार विनायक राऊत यांनी आमदार डॉ.राजन साळवी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक तर केलेच पण त्याहीपुढे "राजन तीन टर्म झाल्या ना..! म्हणजे हैट्रिक झाली....आता चौकार देखील तूच ठोकायचा आहेस.आशा शब्दात आमदार राजन साळवी यांच्या पुढील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.तेव्हा उपस्थितांनी देखील राजन साळवी आगे बडो च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

      राजन साळवी म्हणजे कडवा आक्रमक शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी देखील नेहमीच आम.राजन साळवींच्या संघटनात्मक व विकासात्मक कामाचे नेहमीच कौतुक करून तब्बल ३ वेळा राजापूर लांजा संगमेश्वर मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि आम.साळवींनी या संधीचे सोने देखील केले.आता चौथ्यांदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल का या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी जणू सर्व चर्चावर पडदाच टाकला आहे.

      खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने राजापूर तसेच लांजा तालुक्यात आम.राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.राजापूर येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी आम.राजन साळवी यांची पक्षनिष्ठा त्यांचा धाडसी आक्रमक स्वभाव तसेच मतदारसंघात त्यांचा असणारा थेट संपर्क व विकास कामांचे कौतुक करत पुढील वाटचाल उज्वल असल्याचे नमूद केले.

    तर लांजा येथील कार्यक्रमात आपल्या भाषणात खासदार राऊत यांनी पुढील वाटचालीचे स्पष्ट असे संकेतच दिले.विकास कामांचा पाठपुरावा आणि शासनाकडून निधी आण्यामध्ये राजन साळवींचा हातखंडा वेगळाच आहे.एखादा विषय हातात घेतला की स्वतःही स्वस्थ बसत नाही आणि आम्हला देखील बसू देत नाही.असे नमूद करत ते म्हणाले"राजन"किती टर्म झाल्या...आम.साळवी म्हणाले ३ ..म्हणजे हैट्रिक झाली....आता राजन चौकार ही तूच ठोकायचा आहे.२०२४ च्या विधानसभेत या मतदारसंघाचा आमदार म्हणून तुलाच जायचे आहे.आणि हे मी सर्वांसमोर जाहीरपणे बोलतो आहे.असे स्पष्टपणे सांगत खासदार विनायक राऊत यांनी आमदार राजन साळवी यांच्या चौथ्या उमेदवारीचे संकेत दिले तेव्हा उपस्थितांनी देखील राजन साळवी आगे बडो च्या घोषणा देत जोरदार समर्थन केले.त्यामुळे आम.राजन साळवी यांच्या आगामी उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.