खेड तालुक्यातील नीरबजी धबधब्याजवळ काय आहे? वाचा संपूर्ण बातमी
रुबिन मुजावर ...
सह्याद्री पर्वतरांग जेवढी कणखर तेवढीच सात्विक व सुंदर आहे या रांगांमध्ये निसर्गाने अनेक चमत्कार घडवून ठेवलेत
खेड तालुक्यातील कांदेशी हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव असून येथील सातविक निरबजी धबधबा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा असा प्रयत्न येथील ग्रामस्थ करत आहेत धार्मिक पर्यटन क्षेत्र विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या निसर्गसौंदर्याने नटलेल्या धबधबा व तेथील स्थापन पुरातन शिवलिंग नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही खेड तालुक्याला सातारा जिल्ह्याच्या बाजूने सह्याद्री पर्वत रांगेची भक्कम तटबंदी भासलेली आहे या जैवविविधतेने नटलेल्या उत्तुंग पर्वत रांगांमध्ये रसाळगड, सुमारगड, महिपतगड दुर्ग आधी इतिहासाची साक्ष देणारे किल्ले पर्यटकांना आकर्षित करतात
रत्नागिरी व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या पर्वतरांगांमध्ये कांदेशी हे गाव वसले आहे या गावातच सह्याद्रीच्या खोऱ्यात तीनशे ते साडेतीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा आहे कड्यावरून कोसळणारे धबधबे याने सुमारे पन्नास फूट लांब व दहा फूट रुंद व नैसर्गिक गुहेची निर्मिती झाली आहे या गुहेत शेकडो वर्षांपूर्वी अज्ञात शिवपुर शिवपिंड प्रतिष्ठापना केली आहे
ग्रामस्थ व काही योगीपुरुष वगळता गेली अनेक वर्षे त्या धबधब्याची माहिती जगापासून आज्ञात होती काही दशकांपूर्वी या धबधब्याच्या गर्भात प्रति स्थापन केलेले शिवलिंग असल्याचे समजल्यावर श्री संत श्रीपाद आनंद यांनी याठिकाणी पाषाणाच्या नवीन शिवलिंगाची स्थापना केली महाशिवरात्रीला काही स्थानिक ग्रामस्थ येथे दरवर्षी पूजन करतात खेड शहरापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर कांदेशी गाव आहे या गावापासून आठ ते दहा किलोमीटर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये कड्यावरून हा धबधबा प्रवाहित होतो
या ठिकाणी पोहोचणे सध्यातरी दुर्गम भाग असल्याने धाडसी गिर्यारोहक स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जंगल पार करून तीन ते चार तासाच्या प्रवासानंतर त्या ठिकाणी पोहोचतात त्या पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या कांदोशी गावातील काही लोकांनाच हे ठिकाण माहीत होते मात्र काही ट्रेकर्स सह्याद्रीची सफर करत त्या ठिकाणी पोहोचले आहेत त्यानंतर या निसर्गाच्या आविष्काराने नटलेल्या परिसराची माहिती पसरू लागली आहे धबधब्यांमुळे निर्माण झालेली गुहा आणि गुहे च्या आत मध्ये शिव पिंड आणि त्या पिंडीवर नैसर्गिक रित्या थेंबाथेंबाने होणारा जलाभिषेक याच गुहेसमोर निर्माण झालेली नैसर्गिक तलाव त्या एखाद्या काचे प्रमाणे स्वच्छ आणि अत्यंत थंड पाणी आहे आजूबाजूला नयनरम्य जंगलाचा परिसर सर्वांच्याच मनाला भुरळ घालणारा आहे
Bni salah transfer