कुंभालीं घाटातील रस्ताचे खड्डे १५ डिसेंबर २१ पर्यंत न भरल्यास रस्ता रोको करणार -अशोकराव जाधव
चिपळूण _ सातारा , सांगली , कोल्हापूर , पुणे , या जिल्हांना जोडणारा आणि कोकणची मुख्य आर्थिक वाहिनी समजली जाणारी व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण , गुहागर , खेड , दापोली , मंडणगड आणि आता तर आंबा घाट खचल्या मुळे सर्व वाहतूक( अवजड वाहनां सहीत ) म्हणजेच जवळ जवळ ८o % वाहतूक कुंभार्लो घाटातून सुरु आहे हे माहीत असताना ही प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे याला अजिबात माफी नाही त्या मुळे १५ डिसेंबर पर्यंत घाटातील खड्डे पुर्ण पणे न भरल्यास लोकांचे प्राण वाचविण्या साठी व विना अपघात वाहतूक सुरळीत होणे साठी जिल्हा काँग्रेस आणि शेतकरी -कष्टकरी संघटना , वाहतूक दार संघटना, जनतेसोबत रस्ता रोको करणार असल्याची घोषणा अशोकराव जाधव यांनी केली आहे .
या बाबत ते पुढे म्हणाले की कुंभार्ली घाटातून प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी एकदाच अवजड वाहनातून , नॉन एसी वाहनातून , टू व्हीलर ने एकदा घाट चढावा व ऊतरावा म्हणजे अपघाताच्या भीतीने पोटात गोळा कसा येतो ते कळेल . दुरुस्तीचे पैसे असताना ही खड्डे तसेच ठेवून पैसे खर्ची पडले असून खड्डातील खर्चाच्या मलईचा गोळा कोणा अधिकाऱ्याच्या खिशात की कोणा पुढाऱ्याच्या खिशात पडला की काय ?याचा शोध कोर्टात केस दाखल केल्यावरच पूर्ण होयील असे अशोकराव जाधव यांनी सांगितले .
या रस्ता रोको अंदोलनात जिल्हा काँग्रेस, चिपळूण काँग्रेस मधील नेते व शेतकरी -कष्टकरी संघटनेचे नेते , वाहतूक दार संघटनेचे नेते व प्रवासी जनता सामिल होणार आहे त्या करीता गावो गावी रस्ता दुरुस्ती करीता जनतेतून ऊठाव व्हावा म्हणून जागृती , बैठका , भेटी गाठी अशोकराव जाधव आणि भरतशेठ लब्धे , महादेव चव्हाण , सुधिरशेठ दाभोळकर , सुधीरशेठ शिंदे , दिपक निवाते , संतोष शेठ शिर्के , अॅड जिवन रेळेकर ,कुंभार , निर्मलाताई जाधव , गौरी रेळेकर .स फा गोटे , अश्विनीताई भुस्कुटे , आर्या कदम , राजेंद्र भुरण ,मैनुद्यीन सैय्यद, विश्वनाथ किल्लेदार , कॅप्टन हनिफ खलफे, नंदूशेठ थरवळ,अल्पेश मोरे , राकेश दाते , समीर रेडीज , संतोष साळवी , बशीर भाई बेबल ,अल्लारखा नदाफ, इत्यादी प्रमुख कार्यकर्त , नेते बैठका भेटीगाठी घेणार आहेत.
Bni salah transfer