अम्बा घाट वाहतूक होणार पूर्वरत? केव्हा ते वाचा
कोकणात झालेल्या अतिवृष्टी मुळे रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याना जोडणारा आंबा घाटाची मोठी पडझड झाल्यामुळे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता त्यानंतर तात्पुरती स्वरूपात डागडुजी करून छोट्या वाहनांची वाहतूक चालू करण्यात आली होती. परंतु एस.टी बस व मोठी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करून सदरची वाहतूक राजापूर तालुक्यातीलपाचल-अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर अशी सुरू करण्यात आली होती
आंबा घाटाची पडझड झाल्यामुळें पाचल-अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर अशी सुरू असल्यामुळे वाहतुकदारांवर मोठा ताण पडत हाेता आज राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता कौशिक रहाटे ह्यांच्याशी आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी चर्चा करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला असता येत्या चार दिवसांत आंबा घाट पूर्णपणे वाहतुकीस सुरू दृष्टीने काम युद्धपातळीवर असल्याची माहिती दिल्यामुळे येत्या चार दिवसांत आंबा घाट वाहतुकीसाठी सुरू होण्यास कोणत्याही अडचण येणार नाही.
Bni salah transfer