गवा रेड्याच्या हल्ल्यानंतर काय झालं त्या शेतकऱ्याचं वाचा सविस्तर
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सत्यात उतरताना कालच्या घटनेवरून दिसत आहे शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून शेतकऱ्याचे पूर्ण आतडे बाहेर काढून टाकले होते मात्र त्या शेतकऱ्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आल्याने त्याचा जीव वाचला आहे सध्या हा शेतकरी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपला उपचार घेत आहे डॉक्टरांच्या मते त्याची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे
या घटनेची खबर मिळताच शेतकरी भिकाजी मांडवकर यांची आज शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी त्यांची जिल्हा शल्यचिकित्सक सौ संघमित्रा फुले ह्यांच्या सह जाऊन भेट घेतली व तब्बेतीची चौकशी केली.
Bni salah transfer