लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे मुलांना शालेय साहित्य वाटप

लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे मुलांना शालेय साहित्य वाटप

 कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज 

लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. *शाळेची माजी विद्यार्थीनी कुमारी अपेक्षा गणपत बोलये  इयत्ता बारावीच्या परीक्षेत 88.17 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला, कुमारी आर्या आजीनाथ पाटील जवाहर नवोदय विद्यालयात निवड, कुमारी अनुजा विजय साळसकर इयत्ता दहावीच्या परीक्षेत 93.60 टक्के गुण प्राप्त करून वेरवली हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक व कुमार निलेश कुळ्ये,द ग्रेट मावळा घाटी मॅरेथॉन स्पर्धेत 50 किमी रनिंग सुवर्णपदक पटकावले या त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचा शाळेच्या व उत्कर्ष मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला*. *सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय केळुसकर मॅडम-नायब तहसीलदार, माननीय तेजस्विनी पाटील मॅडम- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक , लांजा, माननीय नारकर साहेब-महाराष्ट्र टाईम्स वरिष्ठ पत्रकार, माननीय जयवंत विचारे साहेब- उद्योजक, माननीय दत्ताजी कदम साहेब-माजी बांधकाम व आरोग्य सभापती, माननीय तुकारामजी कदम- केंद्रीय प्रमुख, माननीय विलासजी करंबेळे- व्यावसायिक, माननीय भुर्के-माजी सरपंच वाटूळ, माननीय खानविलकर-विवली, लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाचे -सरचिटणीस माननीय मधुकरजी पवार, चिटणीस -माननीय प्रशांतजी साळुंखे- माननीय शंकरराव सुर्वे, माननीय मिरगुले, माननीय चव्हाण मॅडम, माननीय कोलते मॅडम, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष दिनेशजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती -अध्यक्ष श्री.संतोषजी निगम, उपाध्यक्ष सौ.मेघा निब्दे , सदस्य - सौ.नम्रता बोलये- सौ.सान्वी बेर्डे-सौ. संचीता बंडबे-सौ.श्रद्धा नाडणकर- सौ.सायली शिगम-सौ. निकिता शिगम,श्री.प्रकाश बाणे,श्री.संतोष बेर्डे,सौ.प्रियांका शिंदे,सौ.चारुशिला शिंदे, श्रीमती पूजा राऊळ,आशा पवार,गुणवंत विद्यार्थी -कुमारी अपेक्षा बोलये, कुमार निलेश कुळ्ये, कुमारी आर्या पाटील व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी मा.उज्ज्वला उदय केळुसकर मॅडम-नायब तहसीलदार लांजा,मा.तेजस्वीनी पाटील मॅडम- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लांजा,मा..प्रभाकरजी नारकर- पत्रकार महाराष्ट्र टाइम्स मुंबई,मा.दत्ताजी कदम- माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती,मा.जयवंतराव विचारे- चेअरमन रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था गवाणे या मान्यवरांचाही शाळा व उत्कर्ष मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.मा.मधुकर पवार,मा.प्रभाकरजी नारकर,मा.तेजस्वीनी पाटील मॅडम आणि मा.उज्ज्वला केळुसकर मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले*.
शाळेचे मुख्याध्यापक मकरंद लिंगायत यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर उपशिक्षक आजीनाथ पाटील यांनी आभार मानले.