लांजा मनसे सैनिक आक्रमक मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजवावे अशी केली विनंती

लांजा मनसे सैनिक आक्रमक मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजवावे अशी केली विनंती
महामार्गावर पडलेले खड्डे दिसत आहेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा कडून मुंबई-गोवा महामार्गावरिल लांजा येथील खड्डे बुजविणे व योग्य पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यासाठी HAN इफ्रा प्रोजेक्ट मॅनेजर ची भेट घेण्यात आली. 


मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करणाचे काम चालू असून येथे अनेक ठिकाणी माती, पावसाचे वाहते पाणी मुख्य रस्त्यावर आल्यामुळे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे दिसत नाहीत त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशी यांना अतिशय प्रतिकुलतेला सामोरे जावे लागत असून अपघाताची संख्या वाढली आहे.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा शहराध्यक्ष श्री. दिलीप लांजेकर, तालुका अध्यक्ष श्री. मनोज देवरुखकर, उपतालुका अध्यक्ष श्री. राकेश राऊत तसेच तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते.