लांजा शहरात निघाली चिमुकल्यांची पायी दिंडी
रुबीन मुजावर (कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज)
पाऊले चालली पंढरीची वारी..|| झाडे लावा नगरी नगरी ||अशा जयघोषात आज संपूर्ण लांजा शहर दणाणून गेले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक पाच या शाळेतील चिमुकल्या मुलांनी लांजा शहरात पायी दिंडी काढली या दिंडीमध्ये झाडे लावा झाडे जगवा असा संदेश नागरिकांना देण्यात आला
या सर्व चिमुकल्या वारकऱ्यांनी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला त्यामुळे या चिमुकल्यांचं शहरात कौतुक केले जाते
यावेळी अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई, मुख्याध्यापिका सौ. विमल चव्हाण व त्यांच्याबरोबर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व मोठ्या संख्येने विद्यार्थी दिंडीमध्ये उपस्थित होते. लांजा हायस्कूल ते संपूर्ण शहर व त्यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच या ठिकाणापर्यंत ही दिंडी काढण्यात आली त्यामुळे लांजा शहर भक्तिमय वातावरणात विलीन झाल्यासारखं वाटत होतं
Bni salah transfer