रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यालगतच्या गावांना उधाणाच्या मोठ्या लाटांचा धोका
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तीन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून समुद्र खवळलेला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रालगतच्या गावांना, वस्त्यांना स्थानिक तहसील प्रशासनामार्फत नोटिसा दिल्या जातात. मात्र, किनारपट्टीवरील नागरिकांचा मच्छीमार व्यवसाय असल्यामुळे नोटीस देऊन हे नागरिक अन्यत्र जाण्यास उत्सुक नसतात. यावेळी तर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला १४ वेळ उधाणाच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे किनारपट्टीवरील गावे सागरी उधाणाच्या छायेत असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
१३ ते १७ जुलै व ३० आणि ३१ जुलै दरम्यान मोठ्या उधाणाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या संभाव्य सागरी उधाणांची शक्यता विचारात घेऊन हवामान विभागाने किनारपट्टीवरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील गावखडी, हर्णे बंदर, काळबादेवी, दाभोळ, गणपतीपुळे, मालगुंड, केळशी आंबोळगड, जैतापूर, नाटे आदी गावांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग, तारकर्ली, निवती, वेळागर, तांबळडेग, विजयदुर्गयासह अन्य मिळून ६० गावांचा समावेश आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास व त्याचवेळी समुद्राला उधाण आल्यास किनारपट्टी व खाडी लगतच्या गावांमध्ये, वस्तींमध्ये उधाणाचे पाणी घुसण्याचा धोका असल्याने प्रशासनाने अलर्ट जाहीर केला आहे.
Bni salah transfer