राजापुरात मुंबई गोवा महामार्गावर अपघात; ड्रायव्हर व क्लीनर बाल बाल बचावले- स्थानिक ग्रामस्थांनी केली मोठी मदत

राजापुरात मुंबई गोवा महामार्गावर अपघात; ड्रायव्हर व क्लीनर बाल बाल बचावले- स्थानिक ग्रामस्थांनी केली मोठी मदत

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

राजापूर येथे मुंबई गोवा महामार्गावर गाडगीळवाडी डोंगर फाटयावर गोव्याकडून मुंबईकडे जाणारा मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघात ट्रक चालकासह क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक पलटी झाल्याने चालक व वाहक ट्रकमध्ये अडकून पडले होते. मात्र पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईतुन गोव्याकडे जात असलेले  गणेश गायकवाड, अक्षय आहिरे,संदीप बच्छाव या नाशिक येथील मनसे कार्यकर्त्यानी प्रयत्नांची शिकस्त करत या दोघांनाही ट्रक बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

महंमद गफूर वाईद. २३ व मोहमद सिफायत अली. १६ दोघेही रा. जम्मू काश्मिर अशी या जखमी चालक आणि क्लीनरची नावे असून त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय
अधिक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी प्राथमिक उपचार केले असुन
अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीत पाठविण्यात आले