मोडकळीस आलेल्या शेडच्या बातमीमुळे शेड दुरुस्त करण्याची रेल्वे प्रशासनाची लगबग
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामधील निवारा शेडची दुरवस्था असल्याची बातमी कोकण लाईव्ह ने प्रसारित केली होती त्यानंतर कोकण रेल्वे कडून या ठिकाणी असलेल्या शेडची दुरुस्ती चे काम सुरू झाले आहे त्यामुळे प्रवासी वर्गा मधून समाधान व्यक्त केले जात आहे
तसेच *निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण फेसबुक समूहाचे* प्रमुख तसेच पत्रकार संदेश जिमन यांनी नुकतीच समाज माध्यमातून निदर्शनास आणली होती. तसेच माध्यमांना याबाबतीत फोटो बातमी दिली होती या बातमीचा सकारात्मक परिणाम आज बघायला मिळाला. संबंधित यंत्रणांनी या बातमीत मांडलेली परिस्थिती पाहून त्वरित संगमेश्वर रेल्वे स्थानकात *तुटलेली निवारा छत बांधणी सुरू केली आहे.*
नेहमीच सामाजिक भान राखून कोकण रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी धडपड करणाऱ्या संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर समस्येचे त्वरित निवारण व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे आज दिसते.
Bni salah transfer