न्यू इंग्लिश स्कुल लांजा मध्ये रंगले स्नेहसंमेलन ...वर्गमित्र भेटले तब्बल २६ वर्षांनी

न्यू इंग्लिश स्कुल लांजा मध्ये रंगले स्नेहसंमेलन ...वर्गमित्र भेटले तब्बल २६ वर्षांनी
तब्बल 26 वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी छायाचित्रात दिसत आहेत

Kokan live digital news
लांजा येथील न्यू इंग्लिश स्कुल मधील सन १९९५-९६ मधील दहावी -अ बॅचचे स्नेहसंमेलन आणि गुरुजनांचा आदर सत्कार स्नेहमेळवा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार शाळेचे माजी मुख्या. बेर्डे सर यांच्या हस्ते अर्पण करून राष्ट्रगीत व प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये चिंतामणी पोटफोडे यांनी गेट टू गेदर चे महत्त्व विषद केले. गुरुजनांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यमान मुख्या. सौ आठवले मॅडम, माजी मुख्या. बेर्डेसर, विधातेसर, सावंतसर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी यांनी आपली ओळख करून दिली. विद्यार्थी मनोगतामध्ये डॉ.रश्मी किरकिरे, अशोक वाघाटे, सुवर्णा गोसावी, महेंद्र कोलते, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव तथा विद्यार्थी संजय तेंडुलकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व आपापल्या परीने संस्थेच्या मदतीसाठी आवाहन केले. 
    आधीचे विद्यार्थी व आत्ताचे सुजाण नागरिक या नात्याने आपण ज्या शाळेत संस्थेमध्ये शिकलो, त्याचे ऋण कधीही फेडू शकत नाही, पण आपण ज्यामूळे घडलो, त्या शाळेला संस्थेला आपण मदत केली पाहिजे या हेतूने महेंद्र कोलते याने संस्थेच्या, शाळेच्या मदतीसाठी भरघोस निधीचा धनादेश प्रदान केला. त्याच्या या मदतीकरिता संस्थेच्या, शाळेच्या व उपस्थित सर्व विध्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
    त्यानंतर गुरुजनांचे आशीर्वादरुपी भाषणामध्ये विधातेसर, सावंतसर, आठवले मॅडम व बेर्डेसर यांनी सर्वांना मौलिक संदेश दिला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सावंत याने तर आभार स्वाती बामणे हिने मानून सकाळच्या सत्रातील कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
     दुपारच्या सत्रात खेरवसे येथील फार्महाऊस येथे नियोजन करण्यात आले होते. भरपेट जेवणानंतर अंताक्षरी, फनी गेम्स, करा ओके आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडले. व पुढे पून्हा नक्कीच भेटू या विश्वासाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
    जुन्या आठवणींना उजाळा देणारा ... इथली माती, वर्ग, मित्र- मैत्रिनीना आणि शिक्षकांशी जुळलेला एक अतूट ऋणानुबंध कार्यक्रमातुन ओसंडून वाहत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, शाळेची इमारत, आपली वर्गखोली, आपल्या वेळचे मार्गदर्शन करणारे शिक्षक, मित्र- मैत्रिणी तब्बल २६ वर्षानी भेटणार या ओढीने एकत्र आले होते. यातील बहुसंख्य विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात विशेष प्रविण प्राप्त केले आहे.