रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी बंदी लागू ..पुढील दोन महिन्यानंतर पुन्हा होणार सुरू

रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी बंदी लागू ..पुढील दोन महिन्यानंतर पुन्हा होणार सुरू
संग्रहित चित्र

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात 1 जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. पुढील दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहणार आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाला जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रतिसाद दिला असून शंभर टक्के मच्छिमारांनी मासेमारी बंद ठेवत आपल्या नौका किनार्‍यावर ओढल्या आहेत. बंदी कालावधीत अनधिकृत मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य विभागही सतर्क झाला आहे.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. सर्वसाधारणपणे 10 जून दरम्यान कोकणात पावसाला सुरूवात होते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सक्रीय होतो. यावर्षी मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. जुनच्या पंधरवड्यापर्यंत पाऊस कोकणात सक्रीय होण्याची शक्यता आहे. अशावेळी मासेमारी बंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी मत्स्य विभागही अलर्ट झाला आहे.