विनापरवाना व निकृष्ट दर्जाचे खत व बियाणे विक्री केल्यास होणार कारवाई

विनापरवाना व निकृष्ट दर्जाचे खत व बियाणे विक्री केल्यास होणार कारवाई
संग्रहित चित्र

विनापरवाना किंवा मुदत संपलेल्या परवानाधारकांनी अनधिकृतपणे कोणत्याही स्वरूपाची खते, बियाणे विक्री करू नये. अनधिकृतपणे खते, बियाणे यांची विक्री केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुन्हाडे यांनी केले आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.kokanlive.Digital_News


खरीप हंगाम तोंडावर असून, पूर्वतयारीची कामे जिल्ह्यात जोरात सुरू आहेत. शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे खरेदी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत विक्रेत्यांकडून गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून सध्या खते, बियाणे नमुने घेण्याची कार्यवाही जोरदार सुरू आहे. तसेच भरारी पथके दुकानावर धाडी टाकून अशा खते, बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करत आहेत.
विनापरवाना खते, बी-बियाणे, आदींची विक्री राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन-तीन वर्षे परवाना नूतनीकरण केलेला नाही, बोगस बियाणे विक्री करणे या बाबी दिसत आहेत. जिल्ह्यांतर्गत अशा स्वरूपाच्या घटना उघडकीस येत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे