दापोली पोलिस स्टेशन मध्ये मोठी आग लागल्याने स्थानकातील महत्वाचा दस्तऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे

दापोली पोलिस स्टेशन मध्ये मोठी आग लागल्याने स्थानकातील महत्वाचा दस्तऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे

रत्नागिरी:-दापोली पोलीस स्थानकात शॉर्ट सर्किटने आग लागली. शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या दुर्घटनेत पोलीस स्थानकातील महत्वाचा दस्तऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे.
शुक्रवारी राज्यपालांचा दौरा दापोली मध्ये झाला होता. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. शनिवारी
सकाळी ६.३० च्या सुमारास लागली आग. आगीची माहिती मिळताच दापोली नगरपंचायत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या आगीत पोलीस स्थानकातील अनेक रेकार्ड आगीत जळून खाक झाले. मात्र बंदुका व काही रेकार्ड वाचविण्यात दापोली पोलिस व दापोली नागरीकांना यश आले आहे.