हिंदी भाषेतून एकतेच्या आणि नैतिकतेच्या शिक्षणाची गरज – महंमदशेठ रखांगी

हिंदी भाषेतून एकतेच्या आणि नैतिकतेच्या शिक्षणाची गरज – महंमदशेठ रखांगी

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज...

“स्वातंत्र्य पूर्व काळात हिंदी भाषेतून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय विकास साधला गेला. आता पुन्हा एकदा या भाषेतून शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय एकतेचे आणि नैतिकतेचे धडे दिले जावेत.” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महंमदशेठ रखांगी यांनी व्यक्त केले. ते लांजा तालुका हिंदी अध्यापक संघटनेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

सध्या सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात आदर्श राज्य शास्त्र, समाज शास्त्रासोबत राष्ट्रीय एकतेचे आणि नैतिकतेचे धडे दिले जावेत. हिंदी भाषेतून राष्ट्रीय एकता आणि नैतिकता जोपासण्याचे कार्य प्रेमचंद आणि त्यांच्या सोबतच्या साहित्यिक मंडळींनी याअगोदरच केले आहे, ती परंपरा पुढे चालवली पाहिजे. असे त्यांनी प्रतिपादन केले. लांजा येथिल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ सुनिल चव्हाण यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष  मा. रविंद्र इनामदार सर उपस्थित होते. त्यांनी हिंदी अध्यापक संघटनेचे कार्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करते, हे आदर्श कार्य इतर विषय संघटनांसाठी प्रेरणादायी आहे.”असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लांजा तालुका हिंदी अध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री भीमराव खोत सर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि हेतू सांगून डॉ सुनिल चव्हाण यांच्या माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी आणि हिंदी विषयाच्या योगदानाबद्दल माहिती देऊन त्यांचा यथोचित गौरव आदर्श दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या शुभहस्ते करण्याची संघटनेचा उद्देश सफल झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद कुलकर्णी यांनी नेटक्या कार्यक्रमाचे आणि आयोजकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगावे महाविद्यालय त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करेल. तसेच शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेळीच पुरस्कृत केल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री भीमराव खोत यांचे अभिनंदन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे सचिव मा. महेश पाटकर सर आपल्या अतिथी व्याख्यानात, “प्रा. डॉ सुनिल चव्हाण सरांचे आणि लांजा तालुका हिंदी अध्यापक संघटनेचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. मी अनेक वर्षे त्यांच्या विविध उपक्रम कार्यक्रमाविषयी ऐकत आणि पाहत आलो आहे.” असे सांगून संघटनेच्या कार्याला आणि प्रा. डॉ सुनिल चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
 डॉ.सुनिल चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना आई वडील, आदर्श गुरूजन वर्ग आणि  मा.महंमदशेठ रखांगी यांच्या कार्याचा प्रभाव आपल्यावर असल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाचे महत्त्व आणि आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम  दरवर्षी हिंदी विभागामार्फत आयोजित केल्या जातात त्यामुळे तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये दर्जेदार कार्यक्रम संपन्न होत आहेत याचा विद्यार्थी आणि शिक्षकांना खूपच फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुरस्कार आणि मानपत्र दिल्याबद्दल संघटना, सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अलअमीन उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिलावत, स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर रिंगणे हायस्कूलचे श्री अशोक कांबळे सर, सापुचे तळे हायस्कूलचे माजी शिक्षक श्री अजित साळवी सर, पुणसचे श्री अशोक कदम सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावडे हायस्कूलच्या श्रीमती क्रांती करंबेळे मॅडम आणि एकनाथ राणे हायस्कूलच्या सौ. प्रिया भागवत मॅडम यांनी केले तर आभार अलअमीन उर्दू हायस्कूलचे मा. शहानवाज जमादार सर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी लांजा तालुका हिंदी अध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री भीमराव खोत सचिव श्री अशोक कदम सर, कोषाध्यक्ष श्री अजित साळवी सर, सल्लागार व उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. महंमदशफी सय्यद सर, सदस्य शहानवाज जमादार सर, अशोक कांबळे सर, भारत मणिकेरी सर, क्रांती करंबेळे मॅडम आणि सौ. प्रिया भागवत मॅडम तसेच सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.