विजांचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाचा पालू मधे मोठा फटका

विजांचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाचा पालू मधे मोठा फटका

 अवकाळी पावसाचा मोठा फटका हा लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील पालु गावाला बसला असून वादळी वाऱ्याने येथील अनेक घरांवरील सिमेंट पत्रे, निळे उडून हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या बरोबरच आंबा कलमांची मोठी झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्याने घडली आहे


बुधवारी सकाळपासूनच तालुक्यातील वातावरण हे ढगाळ होते. त्यामुळे पाऊस कोसळणार असा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केला होता .बुधवारी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटाने विजांचा कडकडाट करीत पावसाने पालु गावात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालु गावातील अनेक घरांवरील कौले, सिमेंट पत्रे उडवले. यामध्ये येथील ग्रामस्थ बंटी गाडे यांची दोन आंबा कलमे ही वादळी वाऱ्याने मोडून पडली. विनोद अवसरे यांच्या घरावरील सुमारे बाराशे कौले वादळी वाऱ्याने उडून गेली आहेत. तसेच सागर गाडे, संदीप गाडे यांच्या घरावरील सिमेंट पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत .तसेच प्रकाश जावडेकर, सुरेश गाडे यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेले आहेत. त्याचप्रमाणे अशोक शिवराम खाके यांच्या फार्म हाऊस वरील पूर्ण छप्पर उडून गेले आहे. त्यामुळे या सर्व ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.


वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पडलेला पाऊस पावणेपाच वाजता थांबला. मात्र या घटनेत येथील पालु गावातील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे.