मुंबई-गोवा महामार्गावरील कशेळी घाट बोगद्याचे चे काम आता अंतिम टप्प्यावर
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे जवळपास निम्मे काम पूर्ण झाले असून रत्नागिरी ते रायगड दरम्यान कामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे दरम्यान संपूर्ण प्रवासात अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या कशेळी घाटातील दोन बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर चाकरमान्यांचा प्रवास सुसाट होणार आहे केवळ पंधरा मिनिटात रायगड मधून रत्नागिरी त येणार आहे हा घाट पार करण्यासाठी जवळपास एक तास लागत होता आता हा प्रवास सुखकर होणार असल्याने चाकरमान्यांच्या पुढच्या पिढीचे अच्छे दिन येणार आहेत असेच काही चित्र आहे
मुंबईतून कोकणात जाताना चाकरमान्यांना तीन मोठे घाट पार करावे लागतात त्यातील कशेडी घाट हा मोठा घाट होय त्यानंतर परशुराम घाट या दोन्ही पेक्षा काहीसा कमी असा भोस्ते घाट हे तीन घाट पार करून मुंबईतून चाकरमानी रत्नागिरीत येतात आता कशेडी बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा मिनिटात प्रवासी रत्नागिरीच्या हद्दीत पोहोचणार आहेत
डिसेंबर अखेरपर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे म्हणजेच चाकरमान्यांना गणपती उत्सवाला येताना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार नाहीत असेच काही चित्र असेल
या दोन्ही बोगद्याची लांबी दोन पॉईंट चाळीस किलो मिटर इतकी आहे त्यांच्या आत 300 मीटरवर मार्ग आहे एकूण सहा मार्गिका या बोगद्यामध्ये आहेत सध्या बोगद्यांची गटारे केबल फुटपाथ विजेची काम सुरू आहेत खास करून या बोगद्याचे काम करताना मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे मुंबई-गोवा महामार्ग भोगाव गावच्या हद्दीत सुरू होत असताना 70 मीटर चे दोन पूल बांधण्यात आले आहेत यासाठी मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे बोगद्याची उंची 12 मीटर व रुंदी सोळा मीटर आहे दोन बोगदया यांपैकी एका बोगद्याचे 235 मीटरचे काम शिल्लक आहे
मुंबई कडून गोवा कडे जाणाऱ्या ह्या बोगद्याचे काम दोन तीन महिन्यात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आह
Bni salah transfer