यावर्षी चांगला मान्सून बरसणार स्कायमेट ने केलेले भाकित
यावर्षी पाऊस चांगला बरसणार असल्याचे भाकीत स्कायमेट ने वर्तवले आहे यामध्ये महाराष्ट्रात 98 टक्के पाऊस होईल असे देखील सांगण्यात आले आहे
पावसाळ्याच्या जून ,जुलै ,ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात 880.6 या सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटणे यावर्षी वर्तवला आहे हा अंदाज वर्तवितानाच यात पाच टक्के कमी अधिक फरक राहील अशी शक्यता वर्तवली आहे तर जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात दमदार होईल असा देखील दावा करताना महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे पावसाच्या तुलनेत अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पावसावर भारताची शेती आणि संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे
जून महिन्यात 106 टक्के ,जुलै महिन्यात शंभर टक्के ऑगस्ट महिन्यात 95 टक्के व सप्टेंबर महिन्यात 90 टक्के असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे त्यामध्ये राजस्थान, गुजरात मणिपूर ,मिझोरम आणि त्रिपुरा येथे कमी पावसाचा धोका आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होईल असे देखील सांगण्यात आले आहे मागील दोन्ही वर्षी मान्सून व वादळांचा परिणाम झाला होता प्रशांत महासागरातील लहानेंना वादळ दक्षिण पश्चिम मान्सून पूर्वी सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने आज नीनाच्या घटनांचा प्रभाव राहणार नाही त्यामुळे अचानक पावसाची शक्यता आहे असे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी स्कायमेट योगेश पाटील यांनी सांगितला आहे
Bni salah transfer 