एकाच रात्रीत चोरट्यांनी दहा फ्लॅट फोडले चोरांचा पोलिसांकडून शोध सुरू
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर असलेल्या क्रिस्टल रेसिडेन्सी बिल्डींग मधील तब्बल दहा फ्लॅट एकाच वेळी आज शनिवारी पहाटेच्या सुमारास फोडून चोरट्याने चोरी केली. दरम्यान बिल्डिंग मधील फ्लॅट फोडत असताना इतर लोक राहत असलेल्या फ्लॅटना बाहेरून कडी घालून घेत चोरट्यानी सावधगिरी बाळगली. जे दहा फ्लॅट फोडले त्यामध्ये दरवाज्याचा कडी – कोयंडा तोडून चोरट्यानी फ्लॅटमध्ये शिरले. मात्र ही बाब काहींच्या लक्षात येताच फ्लॅट मधील काही लोकांनी आरडाओरड केली. यादरम्यान त्यांनी आणि येथे राहत असलेल्या बिल्डिंग मधील एका फ्लॅट धारकाने या बिल्डिंग खाली येत या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान चोरट्यानी तिथे असलेल्या विटा त्या नागरिकांवर भिरकावत हल्ला केला तसेच चोरटे पळून जात असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न तेथील नागरिकांनी केला असता चोरट्यांच्या हातात असलेली कटावणी घेऊन हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
हे चोरटे पळून जात असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. ही चोरी करत असताना तीन चोरटे होते अशी तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबतची अधिक माहिती पोलीस घेत आहेत पोलिसांकडून संबंधित फ्लॅट मालकांना संपर्क सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Bni salah transfer