मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा बर्निंग थरार चालत्या टेम्पोला आग लागल्याने लाखोंचे सामान जळून खाक

मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा बर्निंग थरार चालत्या टेम्पोला आग लागल्याने लाखोंचे सामान जळून खाक
सौजन्य न्यूज-24 रत्नागिरी

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पुन्हा एकदा एका टेम्पोला आग लागल्याने बर्निंग थरार पाहायला मिळाला आहे आज दुपारी पुन्हा एकदा कशेडी घाटात भोगाव येथे आयशर टेंपोने अचानक पेट घेतल्याने गाडीचे व किराणा मालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारल्याने दुर्घटना टळली. ही घटना आज  दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली


सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरून टेंम्पो चालक कामरान खान  राहणार युपी. हा वापी ते गोवा असा चालला होता. कशेडी घाटात इंजिन मधून धुर येऊ लागल्याने टेंम्पोचा चालक कामरान खान याने टेंम्पो तुन उडी घेतली. त्यानंतर त्याने टेम्पोची पाहणी करीत असतानाच क्षणार्धात टेंम्पोने पेट घेतल्याने तो बचावला. मात्र टेम्पो मधील किराणा माल जळून खाक झाला. याबाबतची खबर महाड अग्निशामक दल व खेड अग्निशामक दलाला देण्यात आली माहिती मिळताच दोन्ही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत टेम्पो मधील परचुटनचे सामान जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.