लोणावळ्यात घडला बर्निंग थरार गाडीने घेतला पेट काय आहे घटना वाचा सविस्तर
आज लोणावळ्यात पर्यटनासाठी येत असलेल्या एका डस्टर कारणे पेट घेतला आणि बर्निंग कारचा थरार अनेकांना पाहायला मिळाला
संपूर्ण घटना अशी की आज गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास खंडाळ्यात एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली ही घटना घडली. लाल रंगाची रेनॉल्ट डस्टर (क्र. एम.एच.04.जी.जे.0353) गाडी घेऊन मुंबई मधून लोणावळा येथे पर्यटनासाठी पाच जण निघाले होते. खोपोली येथे काही काळ थांबल्या नंतर ते खंडाळा बोर घाट चढून वर लोणावळ्याच्या दिशेने येत असताना खंडाळ्यात अचानक त्यांच्या गाडीच्या बोनेट मधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला. मात्र तत्पूर्वी गाडीतील पाचही जणांना गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यश आलं.
सदर घटनेची खबर मिळताच लोणावळा पोलीसचे पो.उप.नि. लतीफ मुजावर, सहा. फौजदार सदाशिव पिरगणवार, पो.ना. मयूर अबनावे, पो. कर्मचारी स्वप्नील पाटील, पोलीस मदतनीस सतीश ओव्हाळ, दर्शन गुरव, तुषार घाडगे, विशाल दातीर, नितेश पडवळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या तसेच आयआरबीच्या अग्निशमन दलाला पाऊण तासात ही आग विझवण्यात यश मिळाले. दरम्यान या कालावधीत जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
Bni salah transfer