राज्यात प्रथमच आगळीवेगळी बीच वरील कुस्ती स्पर्धा रत्नागिरी मध्ये पार पडल्या

राज्यात प्रथमच आगळीवेगळी बीच वरील कुस्ती स्पर्धा रत्नागिरी मध्ये पार पडल्या

 राज्यात प्रथमच घेण्यात आलेली आगळी- वेगळी बीचवरील कुस्ती स्पर्धा रविवार दिनांक 22 मे रोजी मांडवी बीचवर उत्साही वातावरणात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या हस्ते झाले.

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन, मांडवी पर्यटन संस्था व जयभैरव नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेला 70 खेळाडूनी सहभाग नोंदवला. मांडवी येथे झालेल्या बीचवरील कुस्ती स्पर्धेत 50 मुले व 20 मुलींनी सहभाग घेतला होता. कुमारगट (30 किलो), वरिष्ठ गट, महिला कनिष्ठ व वरिष्ठ, 70 किलो वजनी गट, 80 किलो वजनी गट, ओपन अशा गटात ही स्पर्धा घेण्यात आली. डाव प्रतिडावानी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाई विलणकर, राजीव कीर, सदानंद जोशी, चंद्रशेखर केळकर, अमित विलणकर, संतोष कदम, आनंद तापेकर, वैभव चव्हाण, फैयाज खतीब, अंकुश कांबळे, योगेश हार्चेकर, नितीन तळेकर, माजी नगरसेवक बंटी कीर, प्रसन्न सुर्वे, निलेश वारंग आदींनी विशेष प्रयत्न केला.

अमित पेडणेकर यांनी स्पर्धा स्थळाशेजारी तयार केलेल्या वाळू शिल्पाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (अनुक्रमे विजेता व उपविजेता)-कुमार गट (30 किलो) पार्थ नागवेकर (रत्नागिरी), आदित्य पवार (रत्नागिरी). कुमार गट (30 किलो पुढील) पार्थ माटे (चिपळूण), यश जावळे (चिपळूण), वरिष्ठ गट (60 किलो पर्यंत)  किरण घाग (चिपळूण), भावेश सावंत (रत्नागिरी), 70 किलोपर्यंत - महंमद शेख (चिपळूण), केतन शिर्के (रत्नागिरी), 80 किलो पर्यंत- साहील खटकुट (रत्नागिरी), संदीप गुरव (रत्नागिरी), ओपन गट- मारुती बिर्जे (रत्नागिरी), सुयोग कासार (रत्नागिरी), मुली कुमार गट- नेहा दुधाळ (खेड), सलोनी ठसाळे (चिपळूण), वरिष्ठ गट- मोनिका घाग (चिपळूण), कमल नितोरे (रत्नागिरी)