माचाळ वासियांनंतर हुंबरवणेवाडीला दिलेल्या शब्दाची खासदार विनायक राऊत यांनी केली वचनपूर्ती
➡️ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पालू चिंचुर्टी हुंबरवणेवाडी या अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात सुमारे ३५० लोकांची वस्ती वसलेली असून स्वातंत्र्याला ७५ वर्षे होवूनही या गावात रस्ता नाही. पालू ते हुंबरवणेवाडी अशा दोन तासांच्या खडकाळ वाटेवरून पायपीट करताना ग्रामस्थांचा जीव मेटाकुटीला येतो. रस्ता नाही म्हणून वाहने नाहीत. आजारी किंवा वृद्ध व्यक्तीला दवाखान्यात न्यायचे तर डोली करून न्यावे लागते. त्यात डोली वाहुन न्यायला माणसं नसली तर जीव गमवायची वेळ येते. असेच प्रसुतीसाठी एका महिलेला डोलीतुन वाहुन नेत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हायरल झाला आणि *रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसेवक तथा गोरगरीबांच्या यातना दुर करण्यासाठी सदैव तत्पर असणारे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा. विनायक राऊत यांनी त्याची तात्काळ दखल घेवून दि.१४ नोव्हेंबर २०२१ ला सदर वाडीला भेट दिली आणि तेथील ग्रामस्थाच्या समस्या जाणून घेतल्या. कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नेतृत्वाने लवकरच या गावापर्यंत रस्ता आणू असे आश्वासन तेथील ग्रामस्थांना दिले. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना सदर रस्त्याचे अंदाजपत्रक बनविण्यासाठी सांगितले. परंतु अधिकारी सांगत होते की आम्ही अंदाजपत्रक, प्रस्ताव बनवून पाठवतो पण जिल्हा परिषदमध्ये एका रस्त्याला एवढा मोठा निधी आजपर्यंत आलेला नाही. फक्त खासदार विनायक राऊत याना विश्वास होता की, मी हा रस्ता जिल्हा परिषद मार्फत मंजूर करुन आणू शकतो.
सदरहू भेटीनंतर दहाव्याच दिवशी *ग्राम विकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेवुन तेथील लोकांची समस्या त्यांच्यासमोर मांडली आणि सदरहू रस्त्यासाठी २.५० कोटी (दोन कोटी ५० लाख रु.) इतका निधी मंजुर करावा असे लेखी निवेदनही दिले. इतकेच नाही तर आपल्या लोकसभा क्षेत्रातील विकासापासुन व़ंचित राहिलेल्या या वाडीसाठी मुश्रीफ साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
आज देखील मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना देखील *चिरंजीव गितेश विनायक राऊत, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख श्री अरूणभाई दुधवडकर, राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री प्रकाश आंबीटकर* यांनी ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ यांची भेट घेवून सदर विषयाबाबत खासदार विनायकजी राऊत यांच्याशी फोनवरुन संभाषण करुन दिले. त्यावेळी खासदार विनायकजी राऊत यांनी सदर रस्त्याबाबत आजच तात्काळ शासन निर्णय काढण्यात यावा अशी विनंती केली. त्यानुसार *मंत्री महोदयांनी आजच शासन निर्णय काढून पालू चिंचुर्टी हुंबरवणे रस्त्याला २.५० कोटी (दोन कोटी पन्नास लाख) रुपयांना मंजूरी दिली. त्याबद्दल खासदार विनायकजी राऊत यांनी मंत्री महोदयांचे मन:पुर्वक आभार मानले.
Bni salah transfer