रत्नागिरी जिल्ह्यात कारोनाची चौथी लाट येणार? जिल्ह्यात 18 रुग्ण ओमायक्रोन व्हेरीएंट चे आढळले

रत्नागिरी जिल्ह्यात कारोनाची चौथी लाट येणार? जिल्ह्यात 18 रुग्ण ओमायक्रोन व्हेरीएंट चे आढळले
संग्रहित चित्र

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात करोना चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यामुळे चौथी लाट जिल्ह्यात येणार असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले म्हणून मास्क वापरणे खूप गरजेचे असणार आहे

कोकणाचा मुंबईशी थेट संबंध येत असल्याने जिल्ह्यातही त्याचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने कोरोना नियम पाळण्यासंदर्भात आवाहन केले असले तरी ते नागरिकांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. ठराविक नागरिकच मास्क वापरत आहेत. बहुतेक नागरिकांना विनामास्क फिरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढताना दिसत आहे. आरोग्य विभाग दक्ष झाला असून चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्या आहेत. चाचण्या वाढवल्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये आरोग्य विभागाने जिल्ह्यात २४५ कोरोना चाचण्या केल्या. त्यापैकी १८ जणांचा अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ५८४ झाली आहे. सहाजणांनी बुधवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे झालेले रुग्ण ८२ हजार ११ असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६.९६ टक्के आहे.


जिल्ह्यात मृत्यू झाला नसला तरी आतापर्यंत मृतांची संख्या २ हजार ५३४ असून मृत्यूदर ३ टक्के आहे. काल दिवसभरात १८ नवीन बाधित सापडले असून आठवडाभरातील बाधितांचा हा आकडा आता ५० वर गेला आहे. खबरदारी म्हणून कोरोनाचे सर्व नियम पाळणे आता आवश्यक आहे.