कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या . लांजा या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळा उत्साहात संपन्न
रुबिन मुजावर
कोकण लाइवः डिजिटल न्यूज़
कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या . लांजा या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळा संस्थेचे अध्यक्ष श्री . चंद्रकांत रामचंद्र परवडी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रत्नागिरी अर्बन को . ऑप बँकेचे अध्यक्ष व शामराव पेजे स्मृतीन्यासाचे अध्यक्ष डॉ . श्री . सुजितजी झिमण , बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष मा . श्री . सुरेशजी भायजे व शामराव पेजे स्मृतीन्यासाचे संचालक मा . श्री . जितेंद्रजी राऊळ यांच्या प्रमुख उपस्थित श्री गणेश मंगल कार्यालय , लांजा येथे दि . ०१ जून रोजी संपन्न झाला . यावेळी प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .
यानंतर स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री . विलास दरडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल , श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला . तसेच संस्थेच्या स्थापनेपासून २५ वर्षाच्या वाटचालीत सहभाग असणारे विद्यमान संचालक मंडळ सदस्य , प्रवर्तक मंडळ सदस्य , माजी संचालक मंडळ सदस्य , कर्मचारी वर्ग , पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी तसेच संस्थेचे सभासद आणि उपस्थित संस्था प्रतिनिधी व पदाधिकारी अशा एकूण ११० व्यक्तींचे व संस्थांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले . या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचा २५ वर्षाच्या वाटचालीचा इतिहास सांगणारे “ कुणबी वैभव " नावाची स्मरणिका मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली . त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा . चंद्रकांतजी परवडी साहेब यांचा ६४ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला . यानंतर मान्यवर मा.डॉ.श्री . सुजितजी झिमण साहेब , मा.श्री . सुरेशजी भायजे साहेब , मा . श्री . जितेंद्रजी राऊळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . संस्थेचे अध्यक्ष श्री . चंद्रकांत परवडी यांनी संस्थेच्या स्थापनेत आणि विकासामध्ये योगदान असलेल्या सर्व पतसंस्था परिवारातील सदस्य , संस्थेचे सभासद , ठेवीदार , कर्जदार व हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले . तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . संदीप डाफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . प्रभाकर सनगरे सर यांनी केले . या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात आली . तसेच याप्रसंगी संस्थेच्या प्रधान कार्यालयात श्री . सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाचे वेळी संस्थेचे संचालक श्री . शांताराम गाडे , श्री . चंद्रकांत धनावडे , श्री . आत्माराम धुमक , श्री . नंदकुमार आंबेकर , श्री . गणेश जोशी , श्री . बाळकृष्ण जोशी , श्री . संजय रांजणे , सौ . दर्शना बेंद्रे , सौ . लीला घडशी , श्री . सीताराम सांडम , श्री . वसंत , देवरुख व चिपळूण या बंडबे तसेच लांजा तालुक्यातील विविध ठिकाणाहून तसेच रत्नागिरी , राजापूर , तालुक्यातून सुमारे १५०० हून अधिक सभासद , हितचिंतक उपस्थित होते .
Bni salah transfer